PhonePe : PhonePe वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फोन पे ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन घोषणा केली आहे. PhonePe ने आता UAE मध्ये देखील UPI सेवा सुरु केली आहे. फोन पे यूजर्स आता संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI द्वारे पेमेंट करू शकतील.
PhonePe ची ही नवीन सेवा सुरू करण्यामागे भारतीय प्रवाशांना Mashreq’s Neopay टर्मिनल्सवर PhonePe ॲपद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे, जे UAE मधील विविध रिटेल स्टोअर्स, डायनिंग आउटलेट्स येथे आहेत. आणि पर्यटन स्थळांवर आहेत.
UAE मध्ये PhonePe सुविधा
या नवीन सेवेसाठी PhonePe ने दुबईस्थित मश्रेकच्या NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे आणि UPI सेवेचा भारताबाहेर विस्तार करण्याच्या भारत सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे. UAE मध्ये PhonePe ची UPI सेवा सुरू केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय कार्डांची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे. आता भारतातून UAE ला जाणारे पर्यटक त्यांच्या PhonePe ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून Mashreq च्या Neopay टर्मिनल्सवर पेमेंट करू शकतात. मनोरंजक गोष्ट म्हणजे यामध्ये वापरकर्ते भारतीय रुपयातील विनिमय दर आणि खात्यातून डेबिट देखील पाहू शकतील.