photo Jalgaon Parking : बेशिस्त पार्किगमधील 36 दूचाकी केल्या जप्त : मनपा व वाहतूक पोलीसांची संयुक्त कारवाई

photo Jalgaon Parking:  नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्याच्या दोन् ही बाजुने अतिक्रमीत दुकाने व बेशिस्त उभ्या असलेल्या 35 दुचाकींवर आज गुरूवार, 11 जानेवारी स महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक पोलीस शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

 


नेहरू चौक ते टॉवर चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजुला फिरत्या विक्रेत्यांसह वाहनांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्यासह वाहतुकीस रस्ते अपूर्ण पडत होते. याबाबत महापालिकेकडे अनेक तक़्रारी आलेल्या होत्या. त्या सर्वांची दखल घेत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नेहरू चौक ते टॉवर चौकापर्यतचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी व पार्किगसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही बाजुस रस्ता दुभाजकापासून 12 मीटर अंतरापर्यत मार्किंग करून तेथे चारी खोदून सिमेंटचे ब्लॉक गाडलेत. त्यावर आता पिवळे पट्टे मारण्यात येणार आहे.

36 दुचाकींवर कारवाई
आज गुरूवारी सकाळी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक पोलीस यांनी सयुंक्तपणे नेहरू चौक ते टॉवर चौकापर्यतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई केली. तर 35 दुचाकी मनपाच्या ट्रॅक् टरमधून वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्यात. त्यांच्यावर वाहतूक पोलीसांतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

रोज होणार कारवाई
रस्त्याच्या दोन्ही बाजुला मार्किगंचे काम पूर्ण होत आले असून 12 मिटरवर सिमेंटचे ब्लॉकी बसवण्यात येत आहे. त्यामुळे या मार्किगच्या आत असलेल्या दुचाकी, चारचाकी, रिक्ष्ाा यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर रोज कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगीतले.

22 हजाराचा दंड वसूल
आज करण्यात आलेल्या कारवाईत 36 दुचाकी चालकांकडून 22 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहने अधिकृत पार्किंग ठिकाणीच लावावीत.
पोलीस निरीक्ष्ाक देविदास इंगोले, वाहतूक शाखा