पाचोरा : शहरा पाठोपाठ आता ग्रामीण भागातही सोशल मिडीयाचा उपद्रव पाहिला मिळत आहे. पाचोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या चोरून लपून एका १९ वर्षीय तरुणीचे फोटो मार्फींग करुन इंस्टाग्रामवर बनावट खात्यावरुन व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार लक्ष्यात आला आहे. याबाबत पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मागील काही दिवसातच ३ ते ६ सप्टेंबर या तिनच दिवसांत इस्टाग्रामवर बनावट खाते उघउून त्याद्वारे तिचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत.पिडीतेची बदनामी होण्याच्या उद्देशाने तयार केलेले हे फोटो नातेवाईक व इतर मंडळींकडे व्हायरल करण्यात आले. पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.
सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्या तरुणी, महिला व खास करुन महाविद्यालयीन विद्यार्थिनिंनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
गरज नसताना ॲंड्राईड फोनचा वापर करु नये आणि वापर करतानाही त्याद्वारे सोशल मिडीया साईटवरील अनपेक्षीत लिंकला उगाच क्लिक करुन आर्थीक संकटासह परिचितांमध्ये प्रतिमा मलीन होण्याची अधीक भिती असते. शंका येताच जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.