गुलाबी थंडी आणि हिरवागार निसर्ग; हिवाळ्यात महारष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या, ट्रिप होईल अविस्मरणीय

#image_title

हिवाळा ऋतूला सुरुवात झाली असून वातावरणामध्ये काहीसा गारवा जाणवायला लागला आहे. त्यामुळे बरेच जण आता या गुलाबी थंडीत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लान बनवत असतील.

काही जण बाहेरील राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणाचा पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्लॅनिंग करत असतील. तर काही महाराष्ट्रातीलच काही ठिकाणी फिरायला जायचा विचार करत असतील. जर तुम्ही महाराष्ट्रात पर्यटनाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील ठिकाणी जाण्याच प्ल्यानींग करू शकता.

माथेरान
महाराष्ट्रातील हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही अनेक ठिकाणे शोधू शकता. शार्लोट सरोवराप्रमाणेच माथेरानच्या मध्यभागी जंगलांनी वेढलेले हे शांत तलाव आहे. येथे तुम्हाला सनराईज पॉइंट, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि खोऱ्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. लुईसा पॉईंट हे एक उत्तम ठिकाण आहे, याशिवाय, तुम्ही वन ट्री हिल, इको पॉइंट आणि अलेक्झांडर पॉइंट देखील पाहू शकता, हे माथेरानचे सर्वात प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट आहेत. इथून तुम्हाला आजूबाजूच्या टेकड्या आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य पाहता येते.

तोरणमाळ
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक प्राचीन हिल स्टेशन आहे. हे सातपुडा पर्वत रांगेत आहे. येथील निसर्गसौंदर्य अतिशय मनमोहक आहे. तुम्हाला शहराच्या गजबजाटापासून दूर शांततेच्या ठिकाणी जायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य असेल. हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाण मानले जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह येथे भेट देऊ शकता. तुम्हाला इथे ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्ही खडकी पॉइंटला जाऊ शकता. याशिवाय तुम्ही येथील यशवंत मंदिर, तोरण देवी मंदिर आणि गोरखनाथ मंदिराला भेट देऊ शकता.

लोणावळा
येथे तुम्ही भाजा लेणी, भुशी डॅम, ड्यूक्स नोज, पवना तलाव, राजमाची किल्ला, सुनीलचे सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, कुणे धबधबा, तुंगार्ली तलाव, रायवूड पार्क, कॅनियन व्हॅली, इमॅजिका ॲडलॅब्स, मॅप्रो गार्डन, पवना तलाव, रिव्हर्सिंग सेंट यांसारखी ठिकाणे पाहू शकता. विसापूर किल्ला आणि शिरोटा तलाव. तुम्हाला येथे ट्रेक करण्याची संधीही मिळू शकते.