Sarva Pitru Amavasya 2024। यंदा 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे सर्वपित्री अमावस्या ? जाणून घ्या अचूक तिथी आणि श्राद्धविधी

Sarva Pitru Amavasya 2024 । हिंदू धर्मात पितृपक्षाला म्हणजेच श्राद्ध पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्ष हा पूर्वज म्हणजेच पितरांना समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरु झालेला पितृपक्ष अमावास्या तिथीला समाप्त होतो. या कालावधीत पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितर प्रसन्न होत त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. अशात पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही तिथी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यु तिथी माहित नसेल, अशा स्थितीत त्यांचे श्राद्ध अमावस्या तिथीलाही करता येते. मात्र, यंदा सर्वपित्री अमावस्या तिथीबाबात अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तुमच्याही मनात असा संभ्रम असेल तरी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्या नेमकी कधी आणि पूर्वजांचे श्राद्ध कसे करावे याविषयी जाणून घेऊया.

सर्वपित्री अमावस्या तिथी आणि मुहूर्त

पितृपक्षातील प्रत्येक तिथी ही महत्त्वाची असते. मात्र, सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, यंदा सर्वपित्री अमावस्या 02 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. तत्पुर्वी भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 01 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 09 वाजून 39 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर 03 ऑक्टोबर 2024 रोजी 12:18 AM वाजता अमावस्या तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल.

सर्वपित्री अमावस्या पूजाविधी

सर्वपित्री अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदी किंवा तलावात स्नान करा.
तुम्हाला नदी किंवा तलावात स्नान करणे शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही घरी स्नान करावे.
स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करत देवघरात दिवा लावावा.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. शक्य असल्यास या दिवशी व्रत करा.
त्यानंतर मुहूर्तावर तर्पण, श्राद्ध विधी करत पितरांसाठी नैवेद्य द्या.
ब्राह्मनांना भोजन आणि आपल्या क्षमतेनुसार दान द्यावे.
सर्वपित्री अमावस्येला श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करावे.