---Advertisement---
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळलेल्या आणि जवळच्या निवासी संकुलात अपघातग्रस्त झालेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर अर्थात् डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स शुक्रवारी ढिगाऱ्यात सापडला.
अपघाताची कारणे शोधण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा पुरावा असून गुजरात एटीएसने तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठविला आणि अपघाताची चौकशी सुरू केली आहे. गुजरात एटीएस अधिकान्याने सांगितले की, एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाईनर एआय-१७१ विमान ज्या ठिकाणी कोसळले तेथील ढिगाऱ्यात आम्हाला डीव्हीआर सापडला. आम्ही तो ताब्यात घेतला असून तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठविला आहे.
घातपाताच्या संशयातून आम्ही प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या पूजी हॉस्टेलच्या परिसरात विमानाचा अपघात झाला. अपघाताच्या काही मिनिटापूर्वी काय घडले याचे रहस्य डीव्हीआरच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल मिळाल्यावर घटनेच्या कारणाची माहिती समोर येई