Plane Crash : विमान उतरण्याच्या तयारीत असतानाच अचानक कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतरच्या व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यामध्ये विमान जमिनीवर आदळताना आणि त्यानंतर मोठ्या आगीत रूपांतरित होताना दिसतंय. आतापर्यंत या अपघातात ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमानाने १०५ प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांना घेऊन उड्डाण केले होते, मात्र दुर्दैवाने ते अकटाऊ विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू झाले असून, फुटलेल्या विमानाच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा दुर्घटनास्थळी पूर्णपणे तैनात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या दुसऱ्या विमान दुर्घटनेची आठवण या घटनेने करून दिली आहे. रविवारी, ब्राझीलमधील पर्यटकप्रिय ग्रामाडो शहरात लहान विमान कोसळून १० जणांचा मृत्यू, तर १२ हून अधिक जणांना गंभीर दुखापत झाली होती.