प्रवाशांनो, लक्ष द्या ! भुसावळसह महाराष्ट्रातील ‘या’ १४ स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटावर बंदी

भुसावळ :  वर्ष २०२४ संपायला अवघे काही दिवस दिवस शुल्क आहेत. त्यामुळे नववीन वर्ष साजरा करण्यासाठी देशातील जनता सज्ज झाली असून, या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गर्दी होणार आहे. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने, मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध २९-१२-२०२४ ते ०२-०१-२०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील.

‘या’ १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री प्रतिबंधित  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर
लोकमान्य टिळक टर्मिनस
ठाणे
कल्याण
पनवेल
पुणे
नागपूर
नाशिक रोड
भुसावळ
अकोला
सोलापूर
कलबुरगि आणि
लातूर

विशेष सूट 

वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे.

वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात येत आहे.