PM Kisan samman Nidhi Yojana : PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमधून ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा 16 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे.
पंतप्रधान किसान योजनेचे पैसे आल्याने शेतकरी आनंदी आहेत, तर काही शेतकरी असेही आहेत ज्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली नाही. त्यांच्या खात्यात 2,000 रुपये का पोहोचले नाहीत हे समजू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक सुविधा उपलब्ध करून दिली ज्याद्वारे शेतकऱ्याला यासंबधीत माहिती मिळते.
जर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर तुम्ही [email protected] वर मेल पाठवून मदत मागू शकता. किंवा पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता – 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे तुम्हाला 16 वा हप्तामिळेल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.