वंदे भारत : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला.या वंदे भारत गाड्यांमुळे ११ राज्यतील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरात अनेक मार्गांवर धावत यामध्ये आणखी नऊ रेल्वे गांड्याची भर पडणार आहे.या नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत.
या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या कर्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. पायाभूत सुविधांचा वेग देशातील 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारा आहे. आजच्या भारताला हेच हवे आहे. पंतप्रधान म्हणाले की आज एकाच वेळी 9 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. याचे हे उदाहरण आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातसह 11 राज्यांतील लोकांना आज वंदे भारतची सुविधा मिळाली आहे.