PM मोदी उद्या मुंबईत रोड शो करणार, ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी

मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 साठी चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवरही मतदान होणार आहे. आता मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मुंबईतही निवडणुकीचा प्रचार तीव्र झाला आहे. उद्या पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मुंबईत रोड शो करणार आहेत.

उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 मे आणि 17 मे रोजी मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक रस्ते बंद राहणार आहेत. मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.

उद्या (१५ मे) नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोमुळे मुंबईचा एलबीएस मार्ग दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच, मेघराज जंक्शन ते माहुल घाटकोपर रोडवरील आरबी कदम जंक्शनपर्यंत उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन्ही वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 14 आणि 15 रोजी संपूर्ण एलबीएस मार्गावर आणि एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग लागू केले आहे.

15 मे रोजी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत एलबीएस मार्गासाठी पर्यायी मार्ग
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
पश्चिम द्रुतगती महामार्ग
अंधेरी-कुर्ला रोड
साकी विहार रोड
MIDC सेंट्रल रोड
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR)
सायन वांद्रे लिंक रोड
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR)