केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे तरुणांना मिळेल 5000 महिना; काय आहे योजना ? कसा कराल अर्ज ? जाणून घ्या सविस्तर…

PM Internship Scheme: केंद्र सरकारच्या पीएम इंटर्नशिप स्कीम या योजनेद्वारे केंद्र सरकार तरुणांना देशातील अव्वल कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देत ​​आहे. या योजनेत शिकण्यासोबतच विद्यार्थ्यांना दरमहा पैसेही मिळतील. पीएम इंटर्नशिप योजनेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या तरुणांना दरमहा 5,000 रुपये आणि प्रति वर्ष 60,000 रुपये मिळणार आहेत.

तुम्ही हा अर्ज पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in यावर भरू शकता. अर्ज करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र ?

हे उमेदवार अर्ज करू शकतील.

ही योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जात आहे. 1) 21 ते 24 वर्षे वयोगटातील असे भारतीय तरुण, जे कुठेही पूर्णवेळ नोकरी करत नाहीत आणि पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकत नाहीत, ते अर्ज करू शकतील. 2) ज्या तरुणांनी हायस्कूल किंवा त्यापुढील शिक्षण पूर्ण केले आहे, ज्यांचे आयटीआय प्रमाणपत्र आहे, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा आहे किंवा BA, B.Sc, B.Com, BCA, BBA, B.Pharma सारखे अभ्यासक्रम करत आहेत ते अर्ज करू शकतील. 3) ज्यांच्या पालक किंवा जोडीदार यापैकी कोणाचेही वार्षिक उत्पन्न 2023-24 या आर्थिक वर्षात 8 लाखांपेक्षा जास्त नसेल.

हे उमेदवार ठरतील अपात्र.
1) ज्या तरुणांनी आयआयटी, आयआयएम, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएसईआर, एनआयडी, आयआयआयटी मधून पदवी प्राप्त केली आहे ते अर्ज करू शकणार नाहीत.2) ज्यांच्याकडे CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA किंवा कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक आहे ते देखील अर्ज करू शकणार नाहीत. 3) जे केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांतर्गत कोणत्याही कौशल्य, प्रशिक्षणार्थी, इंटर्नशिप किंवा विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग आहेत ते देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. 4) नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम किंवा नॅशनल ॲप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम अंतर्गत कोणत्याही वेळी शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा घेत असलेल तरुण देखील या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.