पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर चार महिन्यांनी मिळते. चार महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत पोहोचते.
दरम्यान, या योजनेचा 19 हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना महत्वाच्या दोन गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
PM किसानचा लाभ मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचे काही तपशील द्यावे लागतात. ते दिले तरच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल, तर नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. लाभार्थी शेतकरी या दोन गोष्टी विसरल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे, जी आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरद्वारे किंवा सीएससी केंद्रावरून बायोमेट्रिक मार्गाने पूर्ण केली जाऊ शकते. जर त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा काही उणीव असेल तर त्यांचा हप्ता अडकू शकतो. यासाठी शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.
कशी कराल ई-केवायसी ?
जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते त्यांच्या केवायसीची स्थिती तपासू शकतात. यासाठी त्यांना pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे फार्मर्स कॉर्नर दिसेल. यामध्ये पहिला पर्याय ई-केवायसी असेल. त्यावर क्लिक करा. यानंतर ओटीपी आधारित ई-केवायसी लिहिले जाईल आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची स्थिती कळेल. KVEC अपूर्ण असल्यास तुम्ही ते अपडेट करू शकता.