शेतात रासायनिक खत टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांना विषबाधा

जामनेर : तालुक्यातील वाकोद येथे १० शेतमजुरांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवार, ९ रोजी घडली. या सर्व मजुरांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील शेतमजूर महिला मंगळवार ९ जुलै रोजी वाकोद शिवारातील शेतात मकाच्या पिकाला रासायनिक खत टाकण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दुपारी ३ वाजता या रासायनिक खतामुळे सर्व मजूर महिलांना अस्वस्थ वाटू लागले. यात द्वारकाबाई अशोक जोशी (वय-३२), पूजा विजय जोशी (वय -२९), ज्योती विकास जोशी )वय-२८), लताबाई मेघराज जोशी (वय ६५), उषा संतोष जोशी (वय- ३०), गुंताबाई उत्तम जोशी (वय-२२), मंगलाबाई शिवाजी जोशी (वय-४०), उर्मिला शिवाजी जोशी (वय-२०), माधुरी शिवाजी जोशी (वय-१४) आणि छाया गजानन जोशी (वय-४०) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली. या घटनेत सर्व मजूर महिलांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.