जळगाव : जिल्ह्यातील पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांना पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एकुण २१ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI),व एकुण १९ नाईक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (HC) पदी पदोन्नती देण्यात आली आहे. शुक्रवार, 5 रोजी रोजी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या दालनात काही पोलीस अंमलदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI)या पदाचा स्टार व पोलीस हवालदार (HC)या पदाची फित पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते लावण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुभेच्छा दिल्या.
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये नदकिशोर बाबुराव सोनवणे, विलास बाबुराव पाटील, चंद्रशेखर गजानन गाडगीळ, मनोज काशिनाथ जोशी, रियाजोद्दीन अमिनोद्दिन काझी, राजेंद्र आधार पाटील, वसंतराव साहेबराव बेलदार, के गणेश कुमार, महेंद्र शिवबा मराठे, शेख युनूस मुसा, प्रवीण युवराज पाटील ,अशोक सदाशिव पाटील, दिनेश उत्तमराव पाटील, राजेंद्र साहेबराव पाटील, विनोद राघो पाटील, संदीप देवराम पाटील, सुनील बाबुराव पाटील, राजेंद्र रामलाल परदेशी, विजय माधव काळे, अकबर जुम्मा, तडवी राजेंद्र भागवत पाटील चंद्रकांत नारायण गोधडे, विनोद जगदेव वाघ ,गजमल माधवराव पाटील ,दीपक शांताराम माळी ,विकास देविदास खैरे ,जितेंद्र मुरलीधर माळी ,एकनाथ धनराज पाटील ,चेतन चंद्रमोहन सोनवणे ,दीपक शांताराम नरवडे,विजय शामराव पाटील, प्रभाकर बाळासाहेब पाटील, गोवर्धन राजेंद्र बोरसे ,ललित मच्छिंद्रनाथ भदाने ,विजय अशोक साळुंखे, नरेंद्र सुरेश नरवाडे ,हेमंत मोहन कोळी, योगेश सूकाराम पाटील, रवींद्र अभिमन पाटील यांचा समावेश आहे.