---Advertisement---
Police Bharti 2025 :
मुंबई : पोलीस बनण्याचे होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरुण भरती प्रतीक्षा करीत असतात. पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण नजरेस पडत असतात. ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.
ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे.
---Advertisement---
भरती प्रक्रिया :
पोलिस भरतीत मैदानी चाचणीत प्रथम उंची, छाती आणि धावणे या गोष्टी तपासल्या जातात. यात प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येते. यात उंची, चाचणी आणि धावणे यांसारख्या गोष्टींची शारीरिक तपासणी केली जाते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित १०० गुणांची परीक्षा असते. तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळमी केली जाणार आहे. यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उमेदवारांची पोलिस दलात नियुक्ती केली जाते.