---Advertisement---

एटीएममधून पैसे चोरण्याची अजब शक्कल, जागरूक ग्राहकामुळे उघड पडली चलाखी

---Advertisement---

नागपूर : एटीएम मशीनमधून पैसे लुटण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवीत असल्याचे उघड होत आहे. यात नागपूर शहरांतून धक्कादायक बातमी येत आहे. येथे एटीएम मशीनमध्ये काळी पट्टी लावून लोकांचे पैसे रोखण्याचा मार्ग चोरट्यांनी आखला होता. त्यानंतर, चोरटे स्वतः जाऊन ते पैसे काढत असत. पोलिसांनी ही फसवणूक पकडली आहे आणि कारवाई सुरू केली आहे.

नागपूरच्या हिंगणा रोडवरील वाडी टी पॉइंट येथे एटीएम मशीन आहे. या मशीनच्या पैसे बाहेर येणाऱ्या ट्रे वरती मशीन सारखीच पट्टी लावण्यात आली होती. या पट्टीमुळे एटीएम मशिनमधून पैसे बाहेर येऊ शकत नव्हते. पैसे काढणारी व्यक्ती तेथून निघून गेल्यावर हे चोरटे पट्टी दूर करुन पैसे घेऊन पसार होत होते.

---Advertisement---

अशीच घटना गुणरत्न प्रसाद डुकरे यांच्यासोबत देखील घडली. तो एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला असता त्याने कार्ड स्वाइप करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्याच्या मोबाईलवर पैसे डेबिट झाल्याचा मॅसेज देखील आला. मशीनमधून नोटा मोजण्याचा आवाजही ऐकू आला, पण पैसे बाहेर आले नाहीत. पैसे काढण्याच्या भागात त्याला कोणताही उघडा स्लॉट दिसला नाही, यामुळे त्याच्या मनात शंका उपस्थतीत झाली.


गुणरत्न यांनी थोडा वेळ वाट पाहिल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत आणि मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने ताबडतोब एमआयडीसी पोलिसांना यासंदर्भाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोखंडी सळई काढून टाकली. या संदर्भात डुकरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच वेळी, आता पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेशी संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---