जळगाव : मराठा समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शरण आलेल्या निलंबित किरणकुमार बकालेंना न्यायालयात हजर करण्यासाठी सोमवार, १५ रोजी पोलिसांची तारांबळ उडाली. मराठा समाजासह छावाचे कार्यकर्ते, जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची न्यायालयात गर्दी झाली. न्यायालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. त्यानंतर न्यायाधीशांच्या निवासस्थानी बकालेंना हजर करण्याचा निर्णय झाला. तेथेही पोलीस बंदोबस्त लावला. बकालेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
एलसीबीचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले, अशी चर्चा शहरात सुरु झाली. त्यानंतर मराठा समाजासह छावाचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांच्या वेगवान हालचालींना सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता न्यायालयात कार्यकत्यांची गर्दी होऊ लागली. पोलिसांनी बंदोबस्तसाठी न्यायालयाच्या आवारात तयारी सुरु केली.
गेट बंद करण्यावर कार्यकर्ते संतप्त
न्यायालयाच्या आवारात कार्यकत्यांची गर्दी होऊ लागल्याने दुपारी दोन वाजता पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याचे आवाहन करुन गेट बंद करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकत्यांनी संताप व्यक्त केला. हे गेट बंद होत नाही, मग आज कशासाठी गेट बंद करताहेत, अशी विचारणा करत छावा मराठा कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत गेट बंद होणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. हे कळताच अन्य कार्यकत्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
न्यायाधिशांच्या निवासाकडे वळविला मोर्चा
बकाले यांना न्यायालयात नव्हे न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करण्यात येत आहे, अशी कुणकुण कार्यकर्त्यांना लागली त्यानंतर त्यांनी न्यायालयातून काव्य रत्नावली चौकाकडे न्यायाधीशांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याठिकाणी बंदोबस्त तैनात करीत न्यायाधिशांच्या निवासस्थानी मार्ग पूर्ण थांबविला. कार्यकर्ते त्यामुळे रस्त्यावर थांबून या कामाकाजाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी थांबले होते. आकाशवाणी, काव्यरत्नावली चौकातही बंदोबस्त लावला.
बकालेंवर कोठडीची संक्रांत
सोमवार, १५ रोजी न्यायालयात सुटी होती. नेमके याच दिवशी किरणकुमार बकाले हे पोलिसांना शरण आले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायाधीश निवास्थानी पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांनी दुपारी ४ वाजता हजर केले. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी मराठासमाजातर्फे अॅड. गोपाळ जळमकर तर बचावातर्फे अॅड. सुरज जहाँगीर यांनी युक्तीवाद केला. न्या. जे. एस. केळकर यांनी बकाले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ४.४० वाजता हे कामकाज संपले.
जिल्हापेठला रवानगी
कोठडी सुनावत्यानंतर बकाले यांची रवानगी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली. सुरक्षितेच्यादृष्टीने जिल्हापेठ ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. याठिकाणी उपअधिक्षक संदीप गावीत, पोनि डॉ विशाल जयस्वाल, पोनि आर. टी. धारबळे हे थांबून होते. मुख्य प्रवेशव्दाराजवळही पोलीस येणाऱ्यांशी काय काम, कोणाला भेटाव्याचे याबाबत विचारपूस करून मग आत सोडत होते. जिल्हापेठता ५५१/२२ या गुन्ह्यात किरणकुमार बकालेंना सोमवारी ११ वा. अटक केली. तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती केल्यानुसार न्यायालयाने ती दिली, अशी माहिती उपअधिक्षक संदीप गावीत यांनी दिली.
निरीक्षकांसह बंदोबस्त तैनात
शनीपेठवे पोलीस निरीक्षक आर. टी. धारबळे, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह अधिकारी पोलीस तसेच आरसीपी पथकाता पाचारण करून न्यायालयात बंदोबस्त लावण्यात आला. तीन वाजता निलंबित बकाले यांना हजर करणार असल्याचे सांगण्यात आल्याने मराठा समाजातर्फे अॅड. गोपाळ जळमकर, बचावपक्षाचे अॅड. सुस्ज जहाँगीर हे न्यायालयात दाखल झाले मात्र ३.३० वाजते तरीही बकातेंना पोलिसांनी हजर केले नाही.
सेवेतून कायमस्वरुपी निलंबित करण्याची मागणी
बकाले यांना कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावी, अशी मागणी समाजाची आहे, असे भिमराव मराठे यांनी सांगितले. न्यायालयात राम पवार, छावाचे संतोष पाटील, वाल्मिक पाटील, धवत पाटील, मनोज मोहिते, अॅड. कुणाल पवार, अॅड. सचिन पाटील, अॅड. अनित पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या मंगला पाटील, वंदना पाटील यांच्यासह महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ?
तत्कालीन पो.नि. बकाले यांनी मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाली. मराठा समाजाने तिव्र संताप व्यक्त करीत त्यांच्या अटकेची मागणी उचलून धरली. तसेच कायदेशीररित्या न्यायालयात लढा सुरु केला. वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी १५ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखत झाता. १५ सप्टेंबरनंतर एएसआय अशोक महाजन यांनी गुन्ह्यातील मोबाइल हरविल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. पहिला अटकपूर्व जामीन अर्ज २६ सप्टेंबर २२ क्र. ८६५/२२ दाखत सत्र न्यायालयात फेटाळला गेला. खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी केलेला अर्ज २१ ऑक्टोंबर २२ रोजी फेटाळण्यात आला. जिल्हासत्र न्यायालयातही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला. तेव्हापासून बकाले फरार होते. ते निलंबित आहे. पण कर्तव्यावर ते हजर झाले नव्हते.