पाचोरा : तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे पोलिसांनी बंद गाळ्यात धाड टाकीत 53 हजाराच्या मुद्देमालासह नऊ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे १ जुलै रोजी रात्री पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बबलू बाळू जगताप (वय-३२) याच्या मालकीच्या बंद गाळ्यावर धाड टाकण्यात आली. यात आरोपी भुषण बारकु बैरागी (वय – 20), सुभान रशीद तडवी( वय -22), प्रविण लक्ष्मण पाटील ( वय – 52 ), वैभव अनिल देवरे (वय-27), आसीफ गुलशर मेवाती (वय – 32), नामदेव अशोक पांचाळ (वय-30), पंढरी भाऊराव सोननी (वय -58), भालचंद्र शहादु भिल (वय – 30 ), खुशाल बाळु जगताप ( वय – 32) (सर्व रा. बांबरुड (राणीचे) हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्या कडून रोख रकमेसह मोबाईल,पत्त्याचा कॅट, असा एकूण 51 हजार 300 रुपयांचे जुगाराचे साहित्यासह मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपी जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. या जुगाऱ्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.