धुळ्यात OYO हॉटेलवर पोलिसांचा छापा; महाविद्यालयीन तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात

#image_title

धुळे : धुळे शहरातील आझादनगर पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘हॉटेल युनिक इन ओयो’मध्ये धाड टाकली. या कारवाईत काही तरुण-तरुणीं आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे  परिसरात मोठी खळबळ माजली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही धाड टाकली आहे.

शहरातील हॉटेल युनिक इन ओयोमध्ये (OYO) आज पोलिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत हॉटेलमधून पोलिसांनी महाविद्यालयीन तरुण व तरुणींना ताब्यात घेतल्यामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील हॉटेल युनिक इनमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अनधिकृतपणे येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज पोलिसांनी अचानक या हॉटेलमध्ये धाड टाकून कारवाई केली आहे. यात पोलिसांनी काही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले आहे. तर हॉटेल मालकाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

कठोर कारवाई होणार

ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींच्या पालकांना बोलावण्यात आले असून, त्यांच्या समोरच याप्रकरणी चर्चा केली जाणार आहे. जर यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलिस प्रशासन अधिक सतर्क

गे ल्याकाही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका अल्पवयीन मुलीची ओयो येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करून एका तरुणाने बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतरया घटनांनंतर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.