भुसावळ/शिरपूर : शिरपूर तालुक्यात शेतीमधील जिवंत गांजाची झाडे असलेल्या शेतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत तब्ब्ल ३७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा एकूण १५०० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाले आहेत. नाशिक आयजींच्या पथकासह शिरपूर तालुका पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात गांजा शेती होत असल्याची माहिती नाशिक आयजी दत्तात्रय कराळे यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. आयजींच्या पथकासह शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापेमारी करीत एक हजार पाचशे किलो वजनाचा व ३७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
संशयीत जगन गुलाब पावरा (भोईटी), दिलीप भावसिंग पावरा (भोईटी) व लाला सोमज्या पावरा (अमरिशनगर) यांच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई.
ही कारवाई विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे तसेच आयजींच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, हवालदार विजय बिलघे, हवालदार प्रमोद मंडलिक, हवालदार विक्रांत मांगडे, चालक सुरेश टोंगारे, शिरपूर तालुक्याचे उपनिरीक्षक सुनील वसावे, मिलिंद पवार, सागर ठाकूर, रोहिदास पावरा, सुनील पवार, मिलिंद पवार, सागर ठाकूर, रोहिदास पावरा, सुनील पावरा, धनराज गोपाळ, चालक म नोज पाटील, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.