---Advertisement---

Police Recruitment : एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर, वाचा काय आहे ?

by team
---Advertisement---

जळगाव :  राज्यात बुधवार, १९ जूनपासून महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरतीकरीत मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.  यात ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जाणार आहेत. 

या भरती प्रक्रियेत उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई)एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहणे बाबतची स्थिती निर्माण होवू शकते.  यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. हि बाब लक्षात घेऊन सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास सूचना देण्यात आली आहे.  ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्याची  सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी.  दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. पोलिस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेआहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील.  उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा”असे जनसंपर्क अधिकारी, जळगाव पोलीस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment