“बायको, दोन शब्द प्रेमाने बोलली असती”, चिठ्ठी लिहित पोलिसाने संपवलं जीवन!

---Advertisement---

 

Police suicide : हल्ली विवाहित महिलाच नव्हे, तर पुरुष आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशात आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पोलिसाने ”बायको, दोन शब्द प्रेमाने बोलली असती”, अशी चिठ्ठी लिहित आपलं जीवन संपवलंय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे की, “प्रिय भावा, मला माफ कर; तुझा भाऊ आज हे जग सोडून जात आहे. मी तुला आणखी साथ देऊ शकत नाही, याचे मलाही दुःख आहे. मी वडिलांना दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही, किंवा मी आई गंगादेवीची सेवा करू शकलो नाही. कृपया मला माफ कर. आईने मला खूप धैर्य दिले, पण मी इतका तुटलो आहे की गेल्या महिन्यापासून माझी झोप आणि शांती गेली आहे.”

पुढे लिहिले की, आई, मी हे जग सोडून जात आहे. मी माझी आई आणि दोन मुले, तेजस मान आणि दीपांशू, माझ्या भावाला सोपवत आहे. मला या जगावर विश्वास नाही. तुम्ही सर्वांनी मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. मी या जगात राहणार नाही… मी माझ्या वेळेपूर्वी निरोप घेत आहे, तुमचाच महेंद्र. गावातील सर्वांना राम-राम म्हणा आणि सलाम.

सुसाईड नोटमध्ये महेंद्रने पुढे लिहिले की, “प्रिय पत्नी, तू मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिलीस, म्हणून मी तुझ्यासाठी काहीही लिहिणार नाही. हे घर तुझे आणि तुझ्या पालकांचेही घर आहे. तू जिथे असशील तिथे आनंदाने राहा. पण काहीतरी कमी असेल ज्यामुळे मी हे जग सोडून जात आहे. माझ्या प्रिये, तू प्रेमाच्या काही ओळी बोलू शकली असती. तू तरुण आहेस, लग्न कर. आज मी माझ्या वेळेपूर्वी निरोप घेत आहे… तुझाच महेंद्र.”

दरम्यान, त्याच्या पत्नीने तो खूप कर्जबाजारी होता, म्हणून आत्महत्या केली, असा जबाब दिला, तर त्याचा भाऊ आणि मित्र त्याच्यावर कोणतेही कर्ज नव्हते, असे सांगितले. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---