politically North Maharashtra : धुळे, नंदुरबार व जळगावातूनही काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपात ?

politically North Maharashtra : काँग्रेसचे निष्ठावान असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष्ााच्या सदसत्वासह आमदारकीचा राजीनामा देत सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. हा धक्का देत असताना त्यांनी राज्यभरातील पक्ष्ाातील त्यांच्या समर्थक आजी माजी आमदार, कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले आहे. ते ही आता काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत. तर काही जण वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

 

उत्तर महाराष्ट्रातही गळतीस सुरवात

 

दरम्यान उत्तर महाराष्ट्रातही काँग्रेसला गळती लागण्यास सुरवात झाली आहे. याची पहिली सुरवात जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या कन्या व पत्नी यांनी केली. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. हा धक्का सहन होतो न होतो तोच माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांनी सोडचिठ्ठी देत आता भाजपाची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील काही आमदारांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण भोसकर हे पण काँग्रेसचा सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र यावर आमदार खोसकरांनी तूर्तास कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. यासोबतच धुळे जळगाव मधूनही काही कार्यकर्ते व पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत.

भाजपा की अजित पवार गट

 

काँग्रेसला राज्यात गळती लागली आहे. निवडणूक आयोगाने व विधानसभाध्यक्ष्ाांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेल्या निकालानुसार काँग्रेस सोडल्यानंतर भाजपात जायचे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जायचे याबाबत सध्या तरी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण पक्ष्ाात जायचे तर तिकिट पाहिजेच हा मुख्य हेतू असल्याने तो जिकडे साध्य होईल त्या पक्ष्ाात प्रवेश करण्याचे धोरण सध्यातरी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना साथ  देत असताना अजित पवारांकडील पर्यायही कसा खुला होऊ शकतो याची चाचपणीही काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी करत आहेत.

धुळे, नंदुरबार व जळगावातूनही काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपात जाण्याची चर्चा सुरू आहे.