‘त्या’ तक्रारीची लाचलूचपत विभाग करणार चौकशी

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर (पूर्णाड नाका) परिवहन विभागाचे अधिकारी ट्रक चालकांकडून लाच स्वीकारतात तसेच वजन मापात फेरफार करून ट्रक चालकांकडून अवैध मार्गाने पैसे गोळा केले करतात. या अधिकार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.

त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले त्यात ते म्हणाले सीमा तपासणी नाका पूर्णाड येथे नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्या बाबत तसेच सीमा तपासणी नाका पूर्णाड येथे कार्यरत असणार्‍या वजन काट्यांचे कॅलिब्रेशन करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे तसेच याप्रकरणी उचित कार्यवाही करण्या बाबत उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे तसेच सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्यांची तपासणी आठवड्यात एकदा करण्यात यावी याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाना कळविण्यात आले आहे.