---Advertisement---

पीओपीच्या गणेशमूर्तींना राज्य सरकारकडून परवानगी, वाचा सविस्तर

by team

---Advertisement---

मुंबई : राज्यात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे .सगळयांना बाप्पाच्या  आगमनाची आतुरता लागली आहे.तसेच महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी दिली आहे. दरम्यान, मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नसल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

पीओपीच्या गणेशमुर्त्यांना सरकारने परवानगी दिली असली तरी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व महानगरपालिकांना कृत्रिम तलाव तयार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये. यामुळे मूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसेल, याचा विचार राज्य सरकारने केल्याचे केसरकरांनी सांगतिले.ते पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून राज्यात ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल होते.

त्यावरही परिणाम होईल, अशी भीती शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडली होती. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचे दिल्ली प्रदूषण महामंडळाने स्पष्ट केले आहे. गुजरात आणि हैदराबाद मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात. असे असताना राज्य सरकारने अशा मूर्तीवर बंदी घालणे अन्यायकारक आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---