जळगाव : मोबाईलमध्ये आक्ष्ोपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेलींग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात 24 वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून तिच्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. दरम्यान त्याच परिसरातील तरुणाने मे ते 7 सप्टेंबर 23 या कालावधीत तरुणीचे आक्ष्ोपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले.
ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्याने तिला धमकी दिली. पिडीत तरुणीचा विवाह होत असलेल्या तरुणाच्या फेसबूक अकॉउंटसह इंस्टाग्रामवर हे फोटो टाकून बदनामी केली. तरुणीने जाब विचारला असता संशयित तरुणाने आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी देत वेळोवेळी 16 हजाराची तिच्याकडे मागणी केली. भितीतून ही रक्कम तरुणीने त्याला दिली. त्यानंतर या संशयित तरुणाने तरुणीच्या होणाऱ्या पतीच्या इस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर राघव लोहार या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. तरुणीचा आक्षपार्ह फोटोही पाठविला. तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे. तपास पोनि महेश शर्मा करत आहे.