मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे तसेच याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि उमेश कामत यांनाही दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, उमेश कामत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
त्यांनी पोलिसांना तपासामध्ये जे सहकार्य हवे आहे ते त्यांनी करावे आणि गरज पडल्यास तपासामध्ये सहभागीही व्हावे असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केले होते. त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, राजनं मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शुट केले होते.