Stock Market : नवीन वर्षाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात थोड्या वाढीसह झाली आणि त्यानंतर जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. निफ्टी 98 अंकांनी वाढून 23,742 वर बंद झाला. सेन्सेक्स 368 अंकांनी वाढून 78,507 वर आणि निफ्टी बँक 200 अंकांनी वाढून 51,060 वर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले ?
निफ्टीवर, मारुती सुझुकी +3%, महिंद्रा आणि महिंद्रा +2%, L&T +2% आणि इंडसइंड बँक +2%, SJVN +6% वाढीसह बंद झाले. त्याच वेळी,, Moil +4.5%, तान्ला प्लॅटफॉर्म्स +12%, ऑथम इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर +10%, महाराष्ट्र सीमलेस +9% आणि सेंच्युरी प्लायबोर्ड्स +8% हे BSE वर सर्वाधिक नफा मिळवणारे होते.
कोणते शेअर्स घसरले ?
सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज -2%, हिंदाल्को इंडस्ट्रीज -1.4%, अदानी पोर्ट -1% आणि ओएनजीसी -1%, TVS होल्डिंग्ज -12%, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स -5%, कॅन फिन होम्स -4%, जिंदाल सॉ -3.5% घसरणीसह बंद झाले.
FII ची विक्री
काल, वर्षाच्या शेवटच्या दिवशी, FII द्वारे रोख, स्टॉक आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 9300 कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. सलग 10 व्या दिवशी देशांतर्गत निधीद्वारे रोख स्वरूपात 4547 कोटी रुपयांची मोठी खरेदीही झाली.