Stock Market : भारतीय शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, PSU स्टॉक वधारले

Stock Market: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, मंगळवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. आज बाजाराची सुरुवात जोरदार झाली. सेन्सेक्समध्ये ३५० अंकांची वाढ दिसून येत होती. तर निफ्टीमध्ये सुमारे १२० अंकांची वाढ झाली होती. बँक निफ्टी ४०० अंकांनी वधारला होता.

कोणते शेअर्स वधारले ? 

बीईएल, एसबीआय, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी, इंडसइंड बँक सारखे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक वधारले. धातू, पीएसयू बँक, मीडिया, ऑटो, रिअल्टी सारख्या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली जात होती.

त्याच वेळी एचसीएल टेक, एचयूएल, टेक महिंद्रा, विप्रो इन्फोसिसमध्ये घसरण झाली. आज आयटी एफएमसीजी निर्देशांक लाल चिन्हावर होता.

बाजारासाठी महत्वाच्या बातम्या ?

डिसेंबरमधील किरकोळ महागाई ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अन्नधान्य महागाईत घट झाल्यामुळे, सीपीआय साडेपाच टक्क्यांवरून ५.२२ टक्क्यांवर आला आहे. आर्थिक आघाडीवर आणखी एक चांगली बातमी आली आहे. एप्रिलपासून, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १६% ने वाढून सुमारे १७ लाख कोटी रुपये झाले आहे, तर सकल संकलन २०% वाढले आहे.

जागतिक बाजारातील अपडेट्स

सुरुवातीच्या मंदीनंतर अमेरिकन बाजार दिवसाच्या उच्चांकावर मिश्रित बंद झाले. डाउने ३५० अंकांची वाढ नोंदवली, तर नॅस्डॅक सलग चौथ्या दिवशी कमकुवत राहिला, २५० अंकांनी सुधारणा करूनही सुमारे ७५ अंकांनी घसरला.

सलग ४ दिवस वाढ झाल्यानंतर, सोने ३५ डॉलर्सने घसरून २६८५ डॉलर्सच्या जवळ आला, तर चांदी ८ दिवसांची तेजी मोडून ३१ डॉलर्सच्या खाली ३% घसरली. कच्चे तेल ८१ डॉलर्सच्या जवळ स्थिर होते.