Stock market: आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात मजबूत जागतिक संकेतांच्या आधारावर शेअर बाजाराची सुरवात साकारात्मक राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकत तेजी बघायला मिळतेय. सुरुवातीला निफ्टीने वाढीसह 24900चा टप्पा पार केला तर सेन्सेक्समध्ये 350 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
यादरम्यान, निफ्टीवर बँक, फायनान्शिअल, आयटी, ऑटो, फार्मा, मेटल आणि रियल्टी निर्देशांक तेजीत तर FMCG निर्देशांक मंदीत व्यवहार करत आहे. टेक महिंद्रा, HDFC बँक, HCL टेक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील टॉप गेनर्स ठरले आहेत.
देशांतर्गत बाजारासाठी जागतिक संकेत अधिक चांगले दिसत असून भारतीय बाजारांत खरेदी दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकन बाजार तेजीत बंद झाले होते.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची
दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची संपूर्ण देश वाट पाहत असतो. एक तास चालणाऱ्या या विशेष ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदार ट्रेडिंग करतात. एनएसई आणि बीएसई शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करणार आहेत. संध्याकाळी 6 ते 7या वेळात मुहूर्त ट्रेडिंग करता येणार आहे.