नवीन वर्षाच्या दिवसाची सुरुवात देशांतर्गत शेअर बाजारात किंचित वाढीसह झाली आहे. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांची वाढला. निफ्टीही 25 अंकांनी वधारला. बँक निफ्टी किंचित वाढीसह हिरव्या रंगात उघडला. आज बाजारात व्यवहार करतांना सेन्सेक्स 126 अंकांनी वाढून 78,265 वर उघडला. निफ्टी 7 अंकांनी घसरून 23,637 वर तर बँक निफ्टी 19 अंकांनी घसरणीसह उघडला.
निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अपोलो हॉस्पिटल्स, एशियन पेंट्स, ट्रेंट आणि एल अँड टी सारखे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वाढत आहेत, तर निफ्टी 50 निर्देशांकात बजाज ऑटो, अल्ट्रा टॅक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरले आहेत. Hindalco, Doctor Ready’s, Cipla सारख्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
बुधवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू झाला तेव्हा 1771 कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार सुरुवात केली, तर 715 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले. 94 शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही. सुरुवातीच्या व्यवहारात अपोलो हॉस्पिटल्स, सन फार्मा, एशियन पेंट्स, अदानी एंटरप्रायजेस, टीसीएसचे शेअर्स मजबूत वाढीसह उघडले, तर बजाज ऑटो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि आयशर मोटर्सचे शेअर्स लाल रंगात उघडले.
शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान सर्वाधिक तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये बीएसईच्या लार्ज कॅपमध्ये एशियन पेंट्स शेअर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह 2302.50 रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय मिडकॅपमध्ये समाविष्ट असलेले SJVN शेअर (5.65%), GoDigit शेअर (5.11%), AWL शेअर (4.16%), कॅस्ट्रॉल इंडिया शेअर (4%) वर तेजीसह व्यापार करत होते.