---Advertisement---

महत्वाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

by team
---Advertisement---

राज्यातील विविध भागांमध्ये येत्या दोन-तीन दिवसात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रीय पट्टा तयार झाला आहे आणि अरबी समुद्रात आर्दता वाढली आहे. यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.याबरोबरच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात २-४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि तयारी ठेवावी, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाने या स्थितीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
26 डिसेंबर- धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर

27 डिसेंबर- नाशिक, पुणे, नगर,जळगाव,धुळे, नंदूरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment