---Advertisement---
Post Office Scheme : या वर्षी रिझर्व्ह बँकेने (RBI) कडून तीन वेळा रेपो दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे बँकांनी FD वरील व्याजदरातही कपात केली आहे. परिणामी, गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या FD सारख्या साधनांवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी ही एक मोठी समस्या बनली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू वर्षात फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो दरात दोनदा ०.२५% कपात केली आहे, ज्यामुळे तो ६.५०% वरून ६.००% पर्यंत कमी झाला आहे. परिणामी, बहुतेक बँकांनी मुदतपूर्तीच्या व्याजदरात कपात केली आहे, परंतु पोस्ट ऑफिस अजूनही स्थिर आणि आकर्षक व्याजदर देत आहे.
पोस्ट ऑफिस थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येत असल्याने, येथे केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक ठेवीची हमी सरकार देते.
जर तुम्हाला FD ऐवजी चांगला परतावा देणारा सुरक्षित गुंतवणूक पर्याय हवा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या नावाने तसेच तुमच्या जोडीदाराच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडू शकता. यामुळे दोन्ही खात्यांवर वेगवेगळे व्याज मिळेल, म्हणजेच तुम्हाला दुहेरी फायदे मिळू शकतो. एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात त्याच्या PPF खात्यात जास्तीत जास्त ₹ 1.5 लाख जमा करू शकते. तसेच, तो त्याच्या पत्नीच्या खात्यात ₹ 1.5 लाख पर्यंत जमा करू शकतो. दोन्ही खात्यांवर वेगवेगळे व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला समान फायदे मिळू शकतात. टीडी हे एका निश्चित कालावधीसाठी एकरकमी जमा केले जाते आणि मुदतपूर्तीच्या वेळी निश्चित परतावा मिळतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही २ वर्षांच्या टीडीमध्ये ७.०% व्याजदराने २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी २,२९,७७६ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला २९,७७६ रुपये निश्चित व्याज मिळेल.