Post Office ची ही स्कीम आहे महिलांसाठी सुपरहिट

Post Office: पोस्ट ऑफिसच्या विविध योजना असता. तसेच आता  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. ज्याच्या माध्यमातून गुंतवणूक करून मोठा फंड महिला तयार करू शकता व आपली  आर्थिक बाजू मजबूत तयार करता येऊ शकतो.

या योजनेअंतर्गत महिलांना खातं उघडता येतं आणि त्यात  महिला गुंतवणूक सुरू करू शकतात. विशेष बाब म्हणजे या योजनेत तुम्ही गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. तुम्ही या योजनेत एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू झाली. या बचत योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती.सध्या मिळतंय 7.5% व्याज सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर एखाद्या महिलेला दोन योजना सुरू करायच्या असतील तर किमान 3 महिन्यांचे अंतर आवश्यक आहे.ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. यामध्ये व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ आधारावर केली जाते. योजनेच्या शेवटी एकूण व्याज दिलं जातं. खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

प्री क्लोजरबाबत काय नियम?
प्री-मॅच्युअर क्लोजरबाबत काही अटी आहेत. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पालकाचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केलं जाऊ शकतं.