---Advertisement---

राखी पाठविण्याचा डाक विभागाचा अनोखा उपक्रम, सर्वत्र होत आहे कौतुक

---Advertisement---

---Advertisement---

नंदुरबार : श्रावणात येणार व स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सणाची बहीण व भाऊ दोघे आतुरतेने वाट पाहत असतात. हा स्नेहाचा धागा दोघांमधील नाते दृढ करीत असतो. काही बहिणी दुसऱ्या गावात, शहरात राहणाऱ्या भावांकडे सुरक्षितपणे राखी पोहचविण्याची जबाबदारी डाक विभागाकडे विश्वाने सोपवीत असते. यापार्श्वभूमीवर डाक विभागाने वॉटर प्रूफ पाकिटांची व्यवस्था केली आहे. डाक विभागाने हा उपक्रम राबवून बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

शनिवार (९ ऑगस्ट )रोजी साजरा होणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी भारतीय डाक विभाग सज्ज झाला आहे. पोस्ट विभागाने राखी पाठविण्यासाठी वॉटरप्रूफ पाकिटे तयार केली आहेत. दूर राहणाऱ्या भावाला वेळेत राखी पोहोचवण्यासाठी आतापासूनच महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे.


१२ रुपयांचे वॉटरप्रूफ पाकीट असून, वजनानुसार दर.

डिजिटल शुभेच्छांच्या पोस्टाच्या युगात टपाल विभागाकडून प्रत्यक्ष मिळालेली राखी ही भावाला वेगळाच आनंद देऊन जाते. प्रत्येक भावापर्यंत राखी वेळेत पोहोवण्यासाठी पोस्टाने व्यवस्था केली. वॉटरप्रूफ पाकीट १२ रुपयांना असून, त्यामध्ये साध्या पोस्टानुसार पाठवल्यास राखीचे वजन २० ग्रॅमपर्यंत असल्यास ५ रुपये तर ४० ग्रॅम वजनासाठी दहा रुपये या अत्यंत अल्प दरात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच पोस्ट स्पीड पोस्टने जर राखी पाठवायची असल्यास १०० ग्रॅम वजनापर्यंत ४१ रुपये तर ५०० ग्रॅम वजनापर्यंत ५९ रुपये इतक्या अल्प दरात ही सुविधा उपलब्ध आहे. पोस्टाचा पिनकोड व राखी पाठवण्याचे अंतर यावर हे दर अवलंबून आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---