मुंबई : राज्यात सध्या सगळीकडे निवडणुकीचा वारे वाहत आहे. राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अश्यातच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधलं आहे ते मुंबई शहरातील एका पोस्टरने. या पोस्टरची चर्चा आत राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने मुंबईतील अंधेरी भागात काही पोस्टर्स लावले आहेत. या या पोस्टरवरील मजकुराने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे पोस्टर म्हणजे एका अर्थी मनसेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.
‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने अंधेरी पश्चिममध्ये काही पोस्टर लावलेत. सावधान… उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे!!, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. ‘बटेंगे ते काटेंगे’च्या आधारावर मुंबईत ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत.
पोस्टरची चर्चा
उत्तर भारतीयांबाबत मनसे पक्षाने कायम आक्रमत भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये उत्तर भारतीयांवर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक होत असताना हा मनसेसाठी इशारा आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
उत्तर भारतीय सेना हा तोच राजकीय पक्ष आहे. ज्याने विधानसभेच्या निवडणुकीत लॉरेन्स बिश्नोई यांना तिकीट देण्याचा दावा केला होता.हे पोस्टर अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ही पोस्टर आता चर्चेचा विषय बनली आहे. कारण मुंबईत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय राहतात. अंधेरी भागात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक आहे.