---Advertisement---

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात देयक थकविणाऱ्या हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात वीज ग्राहकांकडे कोट्यवधींची वीज देयके थकीत आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर किमान 550 कोटींची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट महावितरणच्या जळगाव विभागास देण्यात आले आहे. चालू महिन्याच्या देयकांसह थकबाकीची संपूर्ण क्षमतेने वसुली केली जात असून, थकबाकीदार असलेल्या एक हजार 200 पेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयांकडे मार्चमध्ये वीज देयकांपोटी सुमारे 30 लाखांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी होती. यात थकबाकी न भरल्याने जिल्हा परिषद इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरण प्रशासनाकडून करण्यात आली आहे होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने तातडीने देयकापोटीची रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. तसेच मार्चअखेर अनेक प्रशासकीय कार्यालयांकडील थकबाकी वसुली करण्यात आली असून, खासगी वीजग्राहक तसेच शासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कटू कारवाई केली जात आहे.

मार्चअखेर थकीत वीज देयकांचा भरणा धीम्या गतीने होता. त्यामुळे जळगाव महावितरण विभागाकडून वीज देयक थकविणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यात जळगाव विभागात आतापर्यंत सुमारे बाराशेपेक्षा अधिक ग्राहकांनी वीज देयक भरणा केले नसल्याचे दिसून आले आहे. अशा थकीत वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरण प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

महिन्यात 550 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट

जळगाव जिल्ह्यात तसेच शहरात शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभाग, घरगुती वीजग्राहक, वाणिज्य वीजग्राहक, औद्योगिक, अशा वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांकडे आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार जळगाव शहरात आतापर्यंत सुमारे 20 टक्के वीज देयके थकबाकी वसुली करण्यात आली असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


आर्थिक वर्ष 2024-2025 मार्चअखेर महावितरणच्या वीजग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी सुमारे 550 कोटी रुपये वीज देयकांची वसुली करण्याचे महावितरण प्रशासनाचे ध्येय होते. त्यानुसार आतापर्यंत फक्त 20 ते 25 टक्के वसुली झाली आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरण्याविषयी वीज ग्राहकांकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार थकीत वीज देयकांपोटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.

गोपाल महाजन, कार्यकारी अभियंता, महावितरण, जळगाव शहर विभाग.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment