प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी रावेर विधानसभेसाठी उमेदवाराची केली घोषणा, यांना दिली संधी

सावदा : रावेर विधानसभेसाठी ‘प्रहार’चे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा ‘प्रहार’चे संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. शहरातील कुलसुमबाई सभागृहात प्रहार संघटनेतर्फे आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रहारचे उत्तर प्रमहाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांची उपस्थिती होती.

आर्थिक असमानता दूर व्हावी
आमदार बच्चू कडू यांनी समाजात असलेली आर्थिक असमानता दूर झाली पाहिजे, असे सांगून प्राध्यापक, कलेक्टर, आमदार, खासदार यांना लाखो रुपये पगार आहे मात्र ग्राउंड लेव्हलवर काम करणारे सर्व लोक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना मात्र अतिशय कमी पगार आहे. ही आर्थिक विसंगती असून ती दूर करण्याचा प्रहार संघटना नेहमी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमचे आज दोन आमदार असले तरी येत्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरू व आमचे किमान २० ते २५ आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रहार कुणाबरोबर राहणार ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत लवकरच सर्व सहकारी यांचे सोबत चर्चा करून निर्णय घेऊ व आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने प्रहार दिव्याग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा सल्लागार शरद बारजिभे, यावल तालुकाध्यक्ष प्रवीण सोनवणे, यावल तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, शहर प्रमुख उत्तम कानडे, सचिव अरुण ठाकूर, यावल तालुका संघटक ललित पाटील, तालुका संपर्क प्रमुख दिलीप आमोदकर, खुशबू चौधरी, महिला आघाडी सल्लागार राजेंद्र गीते, अशोक भावसार इत्यादी दिव्यंग बंधू आणि भगिनी यांनी आमदार बच्चू भाऊ कडू यांची भेट घेतली.