---Advertisement---

प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी फेर नियुक्ती

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी कैबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी फेर नियुक्ती केली.

जळगाव भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, नेताजी सुभाषचन्द्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथजी भांडे यांनी अकोला येथील बैठकीत प्रल्हाद सोनवणे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची फेर नियुक्ती केली आहे. त्यांना फेर नियुक्तीचे पत्र डॉ. दशरथ भांडे, आदिवासी नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, माजी नगराध्यक्ष चत्रभुज आबा सोनवणे, रघुनाथराव दादा इंगळे, मधुकरराव बुध , राज्य संघटक प्रशांत तराळे, एकनाथराव जुवार , संजय कांडेलकर, गंभीर दादा उन्हाळे, दादासाहेब कोळी व इतर प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment