---Advertisement---

हिंदू संस्कारांच्या अभावामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात : विश्व हिंदू परिषद

by team
---Advertisement---

मुंबई  : प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक होत आहे. या तीन दिवसीय बैठकीत देश-विदेशातून आलेले विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ‘अनेक शास्त्रीय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक कुटुंबात दोन किंवा तीन मुले असणे आवश्यक आहे. हिंदू संस्कारांच्या अभावामुळे कुटुंब व्यवस्थाही धोक्यात आली आहे. पाश्चात्य भौतिकवाद, अर्बन नक्षल षड्यंत्र आणि ग्लोबल कॉरपोरेट समूह मनोरंजन माध्यम आणि जाहिरातींद्वारे तरुणांना संभ्रमित आणि संस्कृतीहीन बनवले जात आहे. याच कारणामुळे विवाहबाह्य संबंध आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही वाढ होत आहे.’, असे बैठकीच्या दुसऱ्या सत्रात मांडण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी यांनी पत्रकारांना संबोधित करताना याबाबत सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले, हिंदू युवा शक्तीने देशासमोरील प्रत्येक आव्हानाला नेहमीच प्रतिसाद दिला आहे. लोकसंख्येचा असमतोल हिंदू समाजाच्या अस्तित्वासाठी घातक ठरत आहे. हिंदूंची घटती लोकसंख्या बहुआयामी प्रभाव निर्माण करते. हिंदू ही या देशाची ओळख आहे. हिंदू कमी झाले तर देशाच्या अस्मितेवर आणि अस्तित्वावर संकटाचे ढग तयार होतील. ही परिस्थिती थांबवण्यासाठी हिंदू तरुणांना पुढे जावे लागेल. विलंबित विवाह आणि उज्ज्वल भविष्याच्या भ्रामक संकल्पनांच्या जाळ्यामुळे हिंदू जोडप्यांच्या मुलांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करणे ही काळाची गरज आहे.”

सुखी कौटुंबिक जीवन सुनिश्चित करण्यासाठी आणि मुलांना व वृद्धांना सामाजिक आणि भावनिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विहिंपने तरुणांना त्यांच्या मुळांशी परत जाण्याचे आवाहन केले आहे. देशात व्यसनाधीनतेच्या वाढत्या प्रवृत्तीवरही विहिंपने चिंता व्यक्त केली. १६ कोटींहून अधिक लोक ड्रग्जच्या आहारी गेले आहेत यावरून या समस्येची तीव्रता दिसून येते. विहिंपने युवकांना अंमली पदार्थांच्या आत्मघाती प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आणि आपल्या शैक्षणिक संस्था, शहर आणि प्रांत अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि इतर संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यासोबतच अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या माफिया आणि दहशतवाद्यांच्या संगनमताला आळा घालावा आणि कडक कायदे करून ते पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही विहिंपने विविध सरकारांकडे केली आहे.

युवा पिढीला कळकळीचे आवाहन

‘हिंदूंच्या लोकसंख्येचे घटते प्रमाण, हिंदू कुटुंबांचे होणारे विखंडन, लिव्ह इन रिलेशनशिप, तरुणांमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा वाढता कल ही चिंतेची बाब आहे. या समस्या हिंदू समाजासाठी आव्हान बनल्या असून यावर मात करण्यासाठी देशाच्या युवा पिढीलाच पुढे यावं लागेल.’, असे आवाहन या प्रस्तावातून युवा पिढीला करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment