जळगाव : जागतिक योगा दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरात ओम योगा क्लासच्या माध्यमातून योगाबाबत जनजागृती करण्यात आली.
जागतिक योगा दिनानिमित्त योगासन जनजागृतीअंतर्गत विविध वयोगटातील योग साधकांनी गुरुवार, २० जून रोजी योगासनांची साखळी सादर केली. बाल्यावस्था ते वृद्धावस्था सगळ्यांसाठी योगासनाच महत्त्व आहे. यानुसार बाल्यावस्था ते वृद्धावस्थात करण्यात येणारी विविध योगासनांचे प्रात्येक्षिक दाखविण्यात आले. सुदृढ आणि निरामय आरोग्यासाठी सगळ्यांनी रोज योगासन करायला हवीत. व्यायामात सातत्य असेल तर आरोग्य ही संतुलित राहते. योगशिक्षिका पल्लवी उपासनी आणि सोनाली पाटील यांनी योगासने, आहार याबद्दल माहिती दिली. ओंकार पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रत्येक वयोगटातील साधकांनी विविध योगप्रकार, आसने सादर केली. या योगासन, आसने प्रात्यक्षिकाद्वारे निरामय आरोग्यासाठी योगासनांचे महत्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोज महाबळ कॉलनी हॉल येथे करण्यात आले.