Prime Minister Narendra Modi in Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीत ते आज विविध विकास प्रकल्पांचे उद्दघाटन व पायाभरणी करणार आहेत.
दुपारी 2 वाजता ते आरजे शंकर नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. नंतर पंतप्रधान मोदी वाराणसी येथून रीवा, अंबिकापूर, सरसावा विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, ते लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी विमानतळ येथे धावपट्टी विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारतीसह 2870 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी करतील. याचबरोबर पीएम मोदी काशीमधून छत्तीसगडसह 6 राज्यांना 6,100 कोटी रुपयांची भेट देणार आहेत.
‘खेलो इंडिया’ योजना आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 210 कोटी रुपये खर्चाच्या वाराणसी क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हे अत्याधुनिक क्रीडा संकुल म्हणून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, हॉस्टेल, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, स्टेडियम, इनडोअर शूटिंग रेंज, कॉम्बॅट स्पोर्ट्स ग्राउंड्स यांचा समावेश आहे. लालपूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये 100 बेडचे वसतिगृह आणि सार्वजनिक पॅव्हेलियनचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत.
पंतप्रधान सारनाथमध्ये बौद्ध पर्यटन विकास कामांचे उद्घाटन करतील. या विकासकामांमध्ये पादचाऱ्यांसाठी अनुकूल रस्ते बांधणे, नवीन सीवर लाईन आणि प्रगत ड्रेनेज सिस्टीम, स्थानिक हस्तकला विक्रेत्यांसाठी आधुनिक डिझायनर वेंडिंग कार्टसह संघटित वेंडिंग झोन यांचा समावेश आहे. बाणासूर मंदिर आणि गुरुधाम मंदिरातील पर्यटन विकास कामे, उद्यानांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास इत्यादी इतर अनेक उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्दघाटन
by team
Published On: ऑक्टोबर 20, 2024 12:21 pm

---Advertisement---