2047 पर्यंत देशाचा विकास…एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये भारताच्या भविष्यावर पंतप्रधान मोदींच वक्तव्य

#image_title

नई दिल्ली: सोमवारी एनडीटीव्ही वर्ल्ड समिट कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे. ही कामे करताना विश्रांतीला वाव नाही. भारताच्या यशाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जे काही झाले ते पुरेसे नाही. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत खूप काम केले आहे, मात्र ही विश्रांती घेण्याची वेळ नाही. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे. गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, “गेल्या 10 वर्षात 12 कोटी शौचालये बांधली गेली आहेत. 16 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. 350 वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. याच कालावधीत, गेल्या 10 वर्षांत 15 हून अधिक एम्स उघडण्यात आल्या आहेत. वर्षभरात दीड लाखांहून अधिक स्टार्टअप झाले असून आठ कोटी तरुणांनी प्रथमच मुद्रा कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे”. यावेळी पंतप्रधानां सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, भारताने जगाला दाखवून दिले आहे की डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात. , “ज्या देशांना हा फायदा मिळाला, तेथे खाजगी कंपन्यांनी डिजिटल उपक्रमाचे नेतृत्व केले. क्रांती आली, पण त्याचे फायदे मर्यादितच होते. भारताने जगाला नवे मॉडेल दिले. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आणि जग डिजिटल केले.” सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी मार्ग दाखविला.” 2047 पर्यंत विकसित भारताची दृष्टी याच मानसिकतेचा भाग आहे. असही पंतप्रधान म्हणाले.