गुरुजी तुम्ही सुद्धा? पेढ्यातून गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

---Advertisement---

 


धुळे : सद्यस्थितीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज या संबंधित घटना समोर येत असून, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. तसेच या घटनेचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.

सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरसे याने पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत केली होती. यातून त्यांची ओळख वाढत गेली. याचा गैरफायदा घेत, १७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास, बोरसे याने महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिला शुद्धीवर नसताना तिच्यावर अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चित्रित केला.

अत्याचार केल्यानंतर, मुख्याध्यापक बोरसे याने हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमकीच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले. आर्थिक लुबाडणुकीसोबतच, व्हिडीओच्या आधारावर ब्लॅकमेल करत बोरसे याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचारही केला.

पैशांव्यतिरिक्त, संशयिताने पीडित महिलेच्या सही असलेले पाच ते सहा धनादेशदेखील स्वतःकडे ठेवून घेतले आहेत. अखेरीस, पीडित महिलेने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार, पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच रात्री त्याला अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---