‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप चढला ‘बोहोल्यावर’,साधेपणात उरकलं लग्न  

#image_title

मुंबई : ‘महाराष्ट्री हास्य जत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे नुकतेच लग्न झाले. पृथ्वीकने शुक्रवारी (25 ऑक्टोबर) दुपारी त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्याच्या सर्व चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली. बायको सोबत फोटो पोस्ट करत पृथ्वीकने, ‘५-१०-२०२४… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.’ असं आकर्षक कॅप्शन दिल आहे.

यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्याला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. अखेर पृथ्वीने लग्नसोहळ्यातील काही खास छायाचित्रे शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पृथ्वीकचा विवाहसोहळा पार पडला. कोणताच गाजावाजा न करता पृथ्वीक याने अत्यंत साधेपणात लग्न उरकलं आहे. त्याच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकूळ असं आहे. पृथ्वीकने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लग्नानंतर झालेल्या एका मुलाखतीत पृथ्वीक याने साधेपणात लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘आयुष्यातील खास क्षण मला कुटुंबियांसोबत साध्या पद्धतीने साजरा करायचा होता. लग्नाचा संपूर्ण खर्च आम्ही दोघांनी एका सामाजिक कारणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आम्ही आमच्या लग्नाचा खर्च दोन मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरणार होतो. असं काही तरी करून एखाद्याचं आयुष्य सुंदर बनवता येत असेल तर हेच आमच्या लग्नाचं खास गिफ्ट आहे… असं आम्हाला दोघांना देखील वाटतं..’ अस पृथ्वीकने यावेळी म्हटल. पृथ्वीक आणि बायकोच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.