निवडणुकीआधीच भाजपचा झेंडा बुलंद; भुसावळमध्ये प्रिती पाटील बिनविरोध

---Advertisement---

 

भुसावळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात करत पहिला विजय मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मधून महिला राखीव गटातून प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेषतः नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा विजय मिळवल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोबल आणखी वाढले आहे.

भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मध्ये प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सारिका युवराज पाटिल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना पक्षाने दिलेला AB Form मध्ये तांत्रिक चुका व त्रुटी आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बाद ठरविल्याची माहिती मुकेश नरेंद्र पाटील यांनी दिली.

प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात इतर कोणीही अपक्ष उमेदवार शिल्लक नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातून भाजपने भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच बिनविरोध विजय मिळवून खाते उघडले आहे. विशेषतः नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा विजय मिळवल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोबल आणखी वाढले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांसह विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---