---Advertisement---

वाळूठेक्यावर खासगी मालकी, महसूल प्रशासनाचे मौन !

---Advertisement---

शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील बॅक वॉटर नाई नदीवरील वाळूठेक्यावर काही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी खासगी मालकी बसविली असून, अन्य वाहतूक करणाऱ्यांना येथे मज्जाव करण्यात येतो. येथे मंगळवारी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गटांत तुफान राडा झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद दोंडाईचा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. तोपर्यंत दोंडाईचा अपर महसूल प्रशासन सुस्त असून, बघ्याच्या भूमिकेत आहेत. लाखोंचा महसूल बुडत असून, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

मुजोर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना कोणाचाच धाक उरला नसल्यामुळे शासकीय मालमत्तांवर स्वतःची खासगी मालकी बसविण्यापर्यंत मजल जात असेल, तर यात दोंडाईचा अपर तहसील प्रसासन सपशेल अपयशी ठरले आहे, अशी चर्चा आहे. मंगळवारी दोन गटांत तुफान राडा झाला. घटनेची माहिती गावात कळल्याने काही ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. तोपर्यंत राडा सुरूच होता. हाताबुक्क्यांनी हाणामारी केली जात होती. दुसऱ्या टोळीने वाळूची वाहतूक करायची नाही. हा रस्ता आम्ही बनवला आहे, असे कारण सांगण्यात आले. हाणामाऱ्यांचे गंभीर घटनेत रूपांतर झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अमरावती मध्यम प्रकल्प झिरो पॉइंट, अमरावती नदीपात्रातील दुसऱ्या पाटाजवळील वाळू गेल्या वर्षभरापासून वाळूमाफियांची केंद्रबिंदू ठरली आहे. दिवसरात्र अवैध वाहतूक होत असताना दोंडाईचा येथील अपर तहसील कार्यालयात केवळ वर्षातील चार कारवाया होतात. महसूल विभागातील जिल्हा यंत्रणेने लक्ष घालावे. येथील पर्यावरणाची होणारी हानी रोखावी व अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---