पाचोरा : बदलापुर घटनेच्या निषेधार्थ शहरात काँग्रेससह शिवसेना उबाठा गट यांनी भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन केले.
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्याचा सन्मान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली. दरम्यान, बदलापूर घटनेकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून एक दिवसाचा काळ्या फिती लावून आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शिवसेना उबाठा नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात काँग्रेससह शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडाला व काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेऊन महायुती सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाउस सुरु असतांना या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
या आंदोलनाला काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख सुनील पाटील, नेत्या वैशाली सुर्यवंशी, कॉग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकीरा, प्रदीप पाटील, इरफान मनियार,महीला जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे,कल्पेश येवले, रविंद्र पाटील, प्रकाश सोनवणे, संदीप कोळी शिवसेना उबाठा चे उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, अॅड अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सांवत, अॅड दिपक पाटील, , भरत खंडेलवाल, विकास वाघ, मनोज चौधरी, संदीप जैन, हरी पाटील, राकेश सोनवणे , अभिषेक खंडेलवाल, गजु पाटील, आवेश खाटीक, गजु सावंत, शशिकांत पाटील, नितीन खेडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.