राहुल गांधीच्या फोटोला ‘विश्व हिंदू परिषदे’कडून जोडे मारो आंदोलन

जळगाव : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाला हिंसक म्हणत हिंदू समाजाचा अपमान केला आहे. याविरोधात  विश्व हिंदू परिषदेतर्फे काँग्रेस भावना समोर राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

आपला भारत देश हा हिंदू संस्कृतीचा प्रतीक म्हणून मानलं जातं विदेशात सुद्धा भारतीय संस्कृतीचं पालन केलं जातं या हिंदू संस्कृतीच्या सनातन संस्कृतीच्या आधारावर आपल्या भारत देशाची ओळख असताना देशाचं संसद भवनात विरोधी पक्ष नेत्याकडून देशातील सर्वात मोठा समाज असलेल्या समाजाबद्दल एवढं खालच्या दर्जाचे वक्तव्य करणे म्हणजे बालक बुद्धीपणा दिसून आलेला आहे.

राजकीय स्वार्थासाठी हिंदू समाजाबद्दल असे केलेले वक्तव्य कधीच खपवून घेतलं जाणार नाही या गोष्टीचा तीव्र पडसाद संपूर्ण भारतात दिसून येत आहे या नीच वृत्तीचा  निषेध नोंदवण्यासाठी आज शहरातील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या समोर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच सर्व सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी विभाग मंत्री देवेंद्र भावसार, विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, महानगर मंत्री मनोज बाविस्कर, पवन झुंजारराव, यश पांडे, दीपक दाभाडे, सकल हिंदू समाजातील अनेक धर्मप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते.

 

राहुल गांधी बालक बुद्धी असल्याचे जाणवते. संपूर्ण हिंदू समाजाबद्दल त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे त्यांच्या या बोलण्यातून दिसून येतं.देशातील सकल हिंदू समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी.

– देवेंद्र भावसार, विभाग मंत्री विहिंप